by Hansraj Agrawal | Jul 12, 2025 | Trending News
महाराष्ट्र सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला होता. होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक औषधे लिहून देण्याची परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता सरकारने हा निर्णय माघार घेतली आहे. सरकारने 7 सदस्यांची समिती स्थापन केली असून ही समिती दोन महिन्यांत या प्रकरणावर निर्णय घेईल.विशेष गोष्ट म्हणजे, या प्रकरणात होमिओपॅथी डॉक्टर किंवा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या डॉक्टरांनी असं म्हटलं नाही की जर निर्णय त्यांच्या बाजूने आला नाही तर ते समितीचा निर्णय स्वीकारतील. दोन्ही पक्ष समितीच्या निर्णयाशी सहमत नाहीत. समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग, आयुष संचालनालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी समाविष्ट आहेत. यासोबतच, मॉडर्न मेडिसिन आणि होमिओपॅथी कौन्सिलचे रजिस्ट्रार देखील समितीमध्ये असतील.
मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित सुधारणा
आयएमए (महाराष्ट्र) प्रमुख संतोष कदम म्हणाले की, हे प्रकरण समस्येच्या मुळाशी आव्हान देते. त्यांनी 2014 मध्ये महाराष्ट्र होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्स अॅक्ट आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अॅक्ट 1965 मध्ये केलेल्या सुधारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सुधारणा अजूनही मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
कदम म्हणाले की, समिती या प्रकरणावर विचार करू शकते, पण जर त्यांचा निर्णय सार्वजनिक हिताच्या विरुद्ध असेल तर तो स्वीकारला जाणार नाही. आमच्यासाठी न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
होमिओपॅथिक कौन्सिलने काय म्हटलं?
महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलचे प्रशासक बाहुबली शाह म्हणाले की, समितीवर विश्वास नाही कारण त्यात होमिओपॅथी डॉक्टर नाही. त्यांनी समितीमध्ये एक लिपिक ठेवला आहे. शाह म्हणतात की समितीमध्ये होमिओपॅथीचे तज्ज्ञ असायला हवे होते.
गेल्या 10 दिवसांपासून वैद्यकीय समुदायात चिंता होती की होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाच्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या आधारे आधुनिक औषधे लिहून देण्याची परवानगी दिली जात आहे. लोकांना भीती होती की यामुळे लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम औषधांबद्दल माहिती देतो. आधुनिक औषधे लिहून देण्यासाठी अधिक ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 12, 2025 | Trending News
Jayant Patil Resign: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा अखेर जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज अखेर जयंत पाटील यांची ही मागणी पूर्ण झाली आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
मला प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन सोहळ्यातच केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर अखेर आज त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार झाले आहेत.
जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळत होते. त्यांच्या नेतृत्वात अनेक मोठ्या निवडणुका पक्षाने लढवल्या होत्या. काही ठिकाणी त्यांना यश आलं तर काही ठिकाणी अपयश आलं होतं. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मला या पदापासून मुक्त करा, अशी विनंती केली होती. तेव्हापासूनच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेते व माजी आमदारांच्या नावांची चर्चा होती. आमदार रोहित पाटील यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र शशिकांतत शिंदे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात हा मोठा बदल केला आहे. पक्षाची पूर्णतः जबाबदारी आणि विधानसभेचे अपयश भरून काढण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर असणार आहे. तसंच, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ही मोठी घडामोड असल्याचे पाहायला मिळतेय.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 11, 2025 | Trending News
Sandipanrao Bhumre Liquor License Row : शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे…भुमरेंची भावजय आणि पीएच्या देशी दारू दुकानांच्या परवान्यांवरून गंभीर आरोप करण्यात करण्यात आलेत. या देशी दारू दुकानांना एकाच दिवसात परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भुमरेंच्या दारू दुकांना वायूवेगानं परवानगी कशी मिळते, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
छाया भुमरे यांनी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर स्वयंघोषणापत्र सादर केले. त्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी छाया भुमरे यांच्या परवान्याबाबत घेतलेला ठराव वैध आहे का, याची विचारणा करणारे पत्र गंगापूर गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी त्याच दिवशी हा अर्ज वैध असल्याचं टपालानं कळवलं. या अर्जावर अतिशय झटपट म्हणजे दुसऱ्या दिवशी रोजी राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षकांनी समक्ष जबाब घेतल्याची स्वाक्षरी केली. विशेष म्हणजे त्याच्या आठ दिवसांपूर्वीच छाया भुमरे यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी मुंबईतल्या ओशिवरा व्हिलेजमधील डिसोझा बारचा नूतनीकरण केलेला परवाना स्थलांतर करण्यासाठी अर्ज केल्यानंतर पुढच्या आठ दिवसांत त्यांना परवाना मिळाला.
दारुच्या दुकानासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागली. 13 ऑक्टोबर 2023रोजी छाया भुमरेंचा देशी दारुच्या किरकोळ दुकानासाठी ठराव पांढर ओहळ ग्रामपंचायतीकडून ठराव मंजूर. 8 डिसेंबर 2023 रोजी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर घोषणापत्र सादर झाले. 8 डिसेंबर 2023 रोजी उत्पादन शुल्क अधिका-यांकडून परवान्याबाबतचा ठराव वैध आहे का याची विचारणा झाली. 8 डिसेंबर गटविकास अधिका-यांकडून टपाली अर्ज वैध ठरवण्यात आला. 9 डिसेंबर 2023 रोजी उत्पादन शुल्क उपाध्यक्षांची समक्ष जबाबावर स्वाक्षरी झाली.
भुमरेंच्या दारू दुकानांना वायुवेगानं परवानगी मिळाल्यावरून आमदार रोहित पवारांनी निशाणा साधला. सर्वसामान्य लोकांसाठी यंत्रणा इतक्या वेगानं काम करणार का, असा सवाल पवारांनी केलाय. इतरांना दारू दुकानाच्या परवान्यांसाठी वर्षभर खेटे मारावे लागतात. मात्र भुमरेंना एका दिवसात परवाने देण्याची कृपा कशी झाली असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय.
दारू दुकानांना अवैधपणे एका दिवसात मान्यता देण्यात आली. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय. दारू परवान्यांवरून विरोधकांनी संदीपान भुमरेंना कोंडीत पकडलंय. येत्या काळात यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे..या प्रकरणात भुमरे आता काय स्पष्टीकरण देणार, याकडे लक्ष लागलंय.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 11, 2025 | Trending News
Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय. नवरा-बायकोच्या भांडणात 11 महिन्याच्या मुलाचा मृत्यू.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 10, 2025 | Trending News
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात फॅमिली ड्रामा पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे बंधू एकत्र आलेत. तब्बल 20 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मात्र त्यापाठोपाठ आता रायगडमध्ये तटकरे कुटुंबही एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. सुनील तटकरेंच्या वाढदिवसा निमित्तानं तटकरे कुटुंबीयांचं मनोमिलन झालंय.
आधी पवार, नंतर ठाकरे आणि आता तटकरे कुटुंब एकत्र आले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेला दुरावा संपवून पवार कुटुंब अनेकदा एकत्र आलं. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत आणि आता सर्व मतभेद सारून रायगडमध्ये तटकरे कुटुंबही एकत्र आले.
राजकारणात गेल्या 12 वर्षांपासून तटकरे कुटुंबीयांत निर्माण झालेला दुरावा अखेर दूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त तटकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. एकेकाळी एकत्र असणारं तटकरे कुटूंब राजकीय मतभेदांमुळे एकमेकांचे राजकीय वैरी बनले होते.
माजी आमदार आणि सुनील तटकरेंचे मोठे बंधू अनिल तटकरे यांनी वेगळी चूल मांडली तर माजी आमदार आणि पुतणे अवधूत तटकरे यांनी शिवसेना व नंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानं ही दरी अधिकच वाढली होती. बारा वर्षांत दोन्ही कुटुंबाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. मात्र, सुनील तटकरे यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्तानं हे सर्व कुटुंबीय एकत्र आलेत. त्यामुळे तटकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं…मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी देखील कुटुंबीयांचं स्वागत केलं आणि मग रंगली ती आनंदाची मैफिल.
महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेचे दाखल देशभर दिले जातात. राजकीय मतभेद असले तरी कुटुंब एकत्र ठेवणं ही राज्याची राजकीय संस्कृती आहे. गेल्या काही दिवसांपासून याच राजकीय संस्कृतीचं दर्शन होताना दिसतंय.त्यामुळेच राजकीय मतभेद असतानाही पवार, ठाकरे आणि आता तटकरे कुटुंब एकत्र येताना पाहायला मिळत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 10, 2025 | Trending News
Weather Update: नागपूरसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने मुंबईमध्ये बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, तितकासा पाऊस झाला नसताना आता आज गुरुवारी पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पाऊस कमी होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. विदर्भातील चंद्रपूर, जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या सरींचा अंदाज आहे. दरम्यान उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने कोकणात हाहा:कार माजवला आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता आहे. त्यानंतर विदर्भातही पावसाने जोर धरला. अकोला, वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस पडत होता. त्यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.
पावसाळ्यात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान
एकीकडे मुसळधार पाऊस पडत असतानाच अलिबाग येथे बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अलिबागमध्ये 32.1 अंश सेस्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. इतर भागात कमाल तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवले गेले होते.दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी
गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः मुंबईसारख्या शहरात, जिथे पावसामुळे वाहतूक, शाळा, कार्यालय यांच्यावर मोठा परिणाम होतो. तिथे हवामान अंदाजाची अचूकता पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याचं दिसत आहे. 2020 ते 2024 या चार वर्षांत मुंबईतील मुसळधार पावसाचा फक्त 46 टक्के अंदाज अचूक ठरला आहे. याच माहितीनुसार, 41 टक्के अंदाज पूर्णतः चुकीचे होते. अनेक वेळा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. तर कधी अंदाज दिलाच गेला नाही. आधुनिक तंत्रज्ञान असूनही अंदाज चुकत असल्याने हवामान खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Source link