मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला

मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला


Pratap Sarnaik Vs Narendra Mehta : मुंबईच्या वेशीवर असलेलं मिरा भाईंदर शहर सध्या राजकीय वादामुळे चर्चेत आले आहे. या शहरात महायुतीचा मंत्री विरुद्ध महायुतीचा आमदार असा संघर्ष निर्माण झालाय. शिवसेनेचे ओवळा माजिवड्याचे आमदार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे मिरा भाईंदर मतदारसंघाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सध्या विस्तवही जात नाही. दोघांमधील वादाची ठिणगी दहिसर ते काशीगाव मेट्रोचे उद्घाटनादरम्यान पडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मेट्रोतून प्रवास करताना सरनाईकांनी मेहतांची थेट मुख्यमंत्र्यांकडं तक्रार केली.

Add Zee News as a Preferred Source

मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील हा वाद इथंच थांबेल असं वाटलं होतं. पण दोघांमधील वाक् युद्धाची ही तर सुरुवात होती. प्रताप सरनाईकांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत मेहतांवर आरोपांचा बॉम्बगोळा टाकला. सरनाईकांचा शाब्दिक हल्ला मेहतांनी लगोलग परतावून लावला.

या वादानंतर  नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईकांवर भाईंदरपाड्यातील भूमिपुत्रांची जमीन बळकावल्याचा आरोप करत ठाणे पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या विहंग ग्रुपने आमदार नरेंद्र मेहतांना नोटीस बजावली आणि या जमिनीचा आपल्याकडे कायदेशीर ताबा असून ती बळकावलेली नाही. त्यामुळे बदनामी करणे थांबवावे. अन्यथा, दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटिसीद्वारे दिला. या घटनेमुळे सरनाईक-मेहता यांच्यातील जुन्या वादाला नव्यानं हवा मिळाली. 

सरनाईक-मेहता वादावर भाजपनं  सारवासारव केलीय. हे पेल्यातलं वादळ आहे ते लवकरच शांत होईल असा विश्वास भाजपनं व्यक्त केला. सरनाईक आणि नरेंद्र मेहता दोघंही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. येत्या काळात हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यताच जास्त वाटू लागलीये.

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपने आमदार नरेंद्र मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली

भाईंदरपाडाप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपने आमदार नरेंद्र मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. भाईंदरपाड्यातील जमिनीचा आपल्याकडे कायदेशीर ताबा असून ती बळकावलेली नाही. त्यामुळे बदनामी करणे थांबवावे. अन्यथा, दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटिसीद्वारे दिला आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी भूमिपुत्रांची जमीन बळकावल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाणे पोलिसांकडे केली होती. याविरुद्ध आता विहंग ग्रुपनेही मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आरोप थांबवून प्रकल्पाच्या कामातील हस्तक्षेप थांबवावा, सात दिवसांत तक्रारीही मागे घ्याव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 





Source link

Vidhan Parishad Election 2026: तटकरेंचे निकटवर्तीय की पार्थ पवारांचा बेस्ट फ्रेंड? सुनेत्रा कोणाला देणार उमेदवारी? NCP कडून 5 नावं चर्चेत

Vidhan Parishad Election 2026: तटकरेंचे निकटवर्तीय की पार्थ पवारांचा बेस्ट फ्रेंड? सुनेत्रा कोणाला देणार उमेदवारी? NCP कडून 5 नावं चर्चेत


Vidhan Parishad Election 2026 Ajit Pawar NCP 5 Expected Candidates: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी आहे. मात्र असं असलं तरी भारतीय जनता पार्टी वगळता सत्ताधारी पक्षातील कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना एक जागा लढवणार असून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा लढवणार आहे. मात्र या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी 24 तासांचा वेळ शिल्लक असतानाही उमेदवार जाहीर केलेला नाही. याच पार्श्वभूमीवर पक्षाचा उमेदवार कोण असावा यासाठी मंगळवारी रात्री उशीरा ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमधील इनसाइट स्टोरी समोर आली असून कोणकोणत्या नावांवर चर्चा झाली यासंदर्भातील माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.

Add Zee News as a Preferred Source

या पाच नावांची झाली चर्चा

विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत बैठक मंगळवारी रात्री उशीरा पार पडली. या बैठकीमध्ये विविध नावांवर चर्चा झाली. चर्चा झालेल्या नावांमध्ये राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, जिशान सिद्धकी यांचा समावेश आहे. सूत्रांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. या बैठकीमध्ये माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडेही उपस्थित होते. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला पक्षात सध्या प्रचंड विरोध होत असल्यामुळे त्यांच्या नावासहीत अन्य नावांबाबत देखील बैठकीत खल झाल्याची माहिती मिळत आहे.

राजेंद्र जैन कोण आहेत?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) माजी आमदार आणि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (GDCCB) सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले अध्यक्ष आहेत. ते माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील पक्ष संघटना बळकट करण्यात आणि स्थानिक विकासात त्यांचा मोठा वाटा आहे.

सुरेश बिराजदार कोण?

सुरेश बिराजदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ‘भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना’ आणि ‘भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँके’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (DCCB) अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले असून अडचणीत असलेल्या बँकेला सावरण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची संघटना पुन्हा बांधण्यात योगदान दिले आहे.

चर्चेत असलेले उमेश पाटील कोण?

उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) मुख्य प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत. टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय चर्चांमध्ये (Debates) पक्षाची बाजू अत्यंत प्रभावीपणे आणि अभ्यासू पद्धतीने मांडण्यासाठी ओळखले जातात.

जिशान सिद्धकींचा अल्पपरिचय

जिशान सिद्धकी हे मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते आणि मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, त्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी जिशान यांच्या खांद्यावर आहे.

माजी खासदाराच्या पुत्राचाही समावेश

माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेले विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय आणि बालपणीचे मित्र मानले जातात. ते पुण्यातील रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायाशी संबंधित असून त्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक अनुभव पुणे क्षेत्रापुरताच मर्यादित असला तर पार्थ पवारांच्या गटाचा त्यांना पाठिंबा असल्याने त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.





Source link

विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; भाजपचे धक्कातंत्र, 5 नव्या नावांची घोषणा

विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; भाजपचे धक्कातंत्र, 5 नव्या नावांची घोषणा


Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर झाली आहे. भाजपने 5 जणांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विधानपरिषद पोटनिवडणूक प्रज्ञा सातव यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्यात विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. अद्याप कोणत्याच पक्षाने यादी जाहीर केलेली नाही. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे विवेक कोल्हे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

भाजपच्या यादीची  वैशिष्ट्ये पाहिली असता विभागनिहाय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत विभागीय समतोल साधण्यात आल्याचे दिसून येत आहे.  सुनील कर्जतकर यांच्या रूपाने मराठवाडा, प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपाने कोकण, सुनील भेंडे यांच्या रूपाने विदर्भ तर विवेक कोल्हे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला भाजपने प्रतिनिधित्व दिल्याचं यातून स्पष्ट होते. परंतु विभागीय संतुलनामध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र नंबर लागू शकलेला नाही.

 निवृत्त आमदारांचा पत्ता कट झाला आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून भाजपने पाचही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येते. यामध्ये कार्यकाळ संपत असलेल्या सर्व चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी नाकारत संघटनेतील महत्वाच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे म्हटले जात आहे. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार  निवृत्त होत आहेत.  

एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली असताना या प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राणा आणि कडू यांच्यात काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यानरवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.  बच्चू कडून यांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी रवी राणा मदत करणार का याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीचा संभ्रम अद्याप कायम आहे. कारण विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस बाकी आहेत. असं असताना महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेवर जावं असा मविआ नेत्यांचा आग्रह आहे. मात्र, उद्धव ठाकरे निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे.. तर ठाकरेंच्या मनधरणीसाठी शिवसेना UBT नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे संजय राऊत म्हणतायत की पेढे मिळणार, मात्र हे पेढे देणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला आठ जागा मिळाल्या.  तर, विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीला एक जागा वाट्याला येणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका भाजपच्या राज्यातील शीर्षस्थ नेत्यांकडून घेण्यात आसी आहे. असे  असले तरी, शिवसेनेच्या नेतृत्वाकडून दहावा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी  एकीकडे काँग्रेसच्या मतांवर डोळा ठेवण्यात आला आहे, तर दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’च्या माध्यमातून राष्ट्रवादी (SP) पक्षाच्या मतांमध्ये फूट पाडण्याची खेळीही खेळण्यात येणार असल्याचे समजतंय. मात्र शिंदेंच्या या खेळीमुळे ठाकरेंना फटका बसणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

राज्यातल्या राजकारणात पुन्हा हालचाल वाढलीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  नंदनवन निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे नेते, उपनेते, महत्त्वाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद निवडणूक हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे.. त्याचबरोबर पक्षात सुरू असलेली नाराजी, काही नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.  शिंदे स्वतः यावर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळतेय.. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागल आहे.

 





Source link

महाराष्ट्रातील 11 हजार 91 गावांमध्ये High Alert जाहीर! तुमच्या जिल्ह्यातील किती गावांचा समावेश, पाहिलं का?

महाराष्ट्रातील 11 हजार 91 गावांमध्ये High Alert जाहीर! तुमच्या जिल्ह्यातील किती गावांचा समावेश, पाहिलं का?


Health News Maharashtra: महाराष्ट्रामध्ये एकीकडे उन्हामुळे वाढलेल्या तापमानाची चर्चा असतानाच राज्यातील आरोग्य व्यवस्थेला धक्का देणारी आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी एका आजारासंदर्भात असून राज्यातील 11 हजार गावांना याच पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. मागील महिन्याभरामध्ये महाराष्ट्रात या आजाराचे तब्बल 6 हजार नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

केंद्र सरकारच्या मोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती

केंद्र सरकारने  देशाला क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) करण्यासाठी 100 दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 24 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या 35 दिवसांतच राज्यात 6 हजार 111 नवे क्षयरोगी आढळले आहेत. देशातील दीड लाख, तर एकट्या महाराष्ट्रातील 11 हजार 91 गावांना क्षयरोगाचा धोका आहे. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सध्या ‘एआय’ आधारित व्हीएमटीबी टूलचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे राज्यातील 11 हजार 91 गावे ‘हाय रिस्क’ म्हणून निवडली आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती हाय रिस्क गावे?

यवतमाळ 539, अमरावती 504, नाशिक 488, रायगड 488, नागपूर 482, पुणे 479, चंद्रपूर 467, सातारा 442, गडचिरोली 433, नांदेड 404, अहिल्यानगर 401, रत्नागिरी 388, जळगाव 383, बुलढाणा 364, वर्धा 353, बीड 344, छत्रपती संभाजीनगर 339, कोल्हापूर 310, सोलापूर 291, अकोला 249, जालना 242, गोंदिया 239, लातूर 238, नंदुरबार 238, पालघर 231, भंडारा 226, परभणी 212, ठाणे 212, वाशिम 198, सिंधुदुर्ग 189, धाराशिव 185, सांगली 184, हिंगोली 178, धुळे 171

‘हाय रिस्क’ गावे कोणत्या आधारावर ठरवण्यात आली?

भौगोलिक स्थिती : झाडे, प्रदूषण आणि जलाशयांची स्थितीही लक्षात घेण्यात आली.

आरोग्य स्थिती : कुपोषण, लसीकरणाची व्याप्ती, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग रुग्णांची संख्या हे निकष लावण्यात आले.

जीवनशैली : दारू आणि तंबाखूचे सेवन करणारे लोक, दाट लोकवस्ती आणि कामाच्या ठिकाणाचा डेटा गोळा करण्यात आला.

या आजाराची 4 प्रमुख लक्षणं कोणती?

सततचा खोकला- 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला हे टीबीचे मुख्य लक्षण आहे. कधीकधी खोकल्यातून रक्त येणे किंवा थुंकी येण्यासारखे प्रकारही घडतात.

रात्रीचा घाम- झोपेत भरपूर घाम येणे, कपडे भिजणे हे सुद्धा टीबीचे लक्षण आहे.

वजन कमी होणे- कारण नसताना अचानक वजन कमी होणेसुद्धा टीबीच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे.

ताप- 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ येणारा तापसुद्धा टीबी असल्याचं लक्षण आहे. सामान्यतः असा ताप संध्याकाळी येतो.





Source link

बागेश्वरबाबांना कोल्हापुरी चप्पल मारणाऱ्याला 1.51 लाखांचं बक्षीस जाहीर, कोणी केलीये ही घोषणा?

बागेश्वरबाबांना कोल्हापुरी चप्पल मारणाऱ्याला 1.51 लाखांचं बक्षीस जाहीर, कोणी केलीये ही घोषणा?


Bageshwar Baba Shivaji Maharaj Statement: बागेश्वरबाबा यांनी केलेल्या एका विधानानंतर चांगलंच वादंग पेटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बागेश्वरबाबांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे, तसंच राजकीय नेत्यांनी देखील बागेश्वरबाबांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. या वादानंतर बागेश्वरबाबांनी देखील माफी मागितली आहे. यादरम्यान बागेश्वरबाबांना ‘कोल्हापुरी चप्पल मारणाऱ्याला’ तब्बल 1 लाख 51 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. हे बक्षीस कोणी जाहीर केलं आहे जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या कथित वक्तव्यावरून संताप उसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वरबाबांविरोधात धाराशिवमध्ये शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी बागेश्वरबाबा, संजय गायकवाड आणि भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. यावेळी बागेश्वरबाबांना ‘कोल्हापुरी चप्पल मारणाऱ्याला’ तब्बल 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस शिवप्रेमींनी जाहीर केलं आहे. 

 

दरम्यान, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण तापत असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. 

बागेश्वरबाबांविरोधात राज्यभरात आंदोलन

बागेश्वरबाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानानंतर चांगलंच राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी-विरोधकांनी बागेश्वरबाबांच्या विधानाचा समाचार घेतल्यानंतर  त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी विरोधक आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं आहे. अमरावतीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं, तर सोलापुरात संभाजी ब्रिगेडनं आंदोलन करत विधानाचा निषेध केला. नागपुरात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ , जिजाऊ ब्रिगेड कडून बागेश्वर बाबांविरोधात आंदोलन करण्यात आलं. तर शिर्डीतही शिवप्रेमींनी बागेश्वरबाबांच्या विधानाचा निषेध करत आंदोलन केलं.

बागेश्वरबाबा नेमकं काय म्हणाले होते?

शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या भेटीचा संदर्भ देताना बागेश्वरबाबांनी एक वक्तव्य केलं होतं, शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना राज्यकारभार सांभाळण्याची विनंती केली होती असा दावा बागेश्वरबाबांनी केला, शिवाजी महाराज युद्धानंतर थकले आणि त्यानंतर त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या चरणी मुकुंट ठेवला आणि राजपाट सांभाळण्याची विनंती केल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

सर्व पक्षांकडून टीका

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनीही बागेश्वरबाबांच्या विधानावरून टीका केली आहे. वडेट्टीवारांनी बागेश्वरबाबांना भोंदू म्हटलं आहे. तसंच एक आवाहन करत विजय वडेट्टीवारांनी बक्षिसाची देखील घोषणा केली आगे. तर दुसरीकडे बागेश्वरबाबा यांच्या विधानाला पाठिंबा दिला नसून त्याचा निषेध केल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

खासदार अमोल कोल्हेंनी देखील बागेश्वर बाबा यांना सुनावलं आहे. उत्तरेतून येऊन चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणत खासदार कोल्हेंनी बागेश्वरबाबांवर टीकास्त्र डागलं आहे. याआधीही बागेश्वरबाबांनी संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या एका विधानानं वाद पेटला होता, त्यावेळी त्यांनी अपूर्ण माहितीच्या आधारेच वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली होती, मात्र आता महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. 





Source link

Mumbai Pune Missing Link असं नाव का ठेवले? 25 वर्षा आधीच ठरलं होता सगळा प्लान, स्टोरी जाणून शॉक व्हाल

Mumbai Pune Missing Link असं नाव का ठेवले? 25 वर्षा आधीच ठरलं होता सगळा प्लान, स्टोरी जाणून शॉक व्हाल


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

YouTube
Instagram
WhatsApp