'चुलत्याच्या कृपेनं आपलं बरं चाललंय', अजित दादांच्या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पुन्हा चर्चा!

'चुलत्याच्या कृपेनं आपलं बरं चाललंय', अजित दादांच्या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पुन्हा चर्चा!


Ajit Dada On Sharad Pawar: बीडमधील एका कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरुय. दरम्यान दादांच्या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावलाय. 

राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवारांनी अनेकवेळा शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. मात्र, बीडमधील कार्यक्रमात याच अजित पवारांना शरद पवारांबाबत प्रेमाचा उमाळा आलाय. चुलत्याच्या कृपेनं आपलं बरं चाललंय असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र शरद पवारांवर निशाणा साधलाय. काकांना आशीर्वादापुरतचं मर्यादित ठेवल्याचा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.  काकांना आशीर्वादासाठी मर्यादीत त्यांनी ठेवलं आहे. हे तुम्हाला कोणालाच लक्षात आलेलं नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागत अनेक आरोप केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार चांगलेच मवाळ झाल्याचं पाहायला मिळाले.. तसंच अजित पवारांनी आज केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत..

अजित पवारांच्या बीड दौऱ्यात मुंडे गैरहजर

एकीकडे धनंजय मुंडे यांनी आजारी असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नसल्याचं सांगितलं. मात्र आदल्या दिवशी धनंजय मुंडे आपल्या मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले. याबाबत मंत्री आणि त्यांच्या बहिण पंकजा मुंडेंना विचारलं असता, काय चाललंय मला माहित नाही, पण त्यांची तब्बेत बऱ्याच दिवसांपासून बरी नाही असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यातील वाल्मिक कराडचा सहभाग, वाल्मिक आणि धनंजय मुंडेंचे संबंध यामध्ये धनंजय मुंडे चांगलेच अडकले आहेत. या प्रकरणावरून धनंजय मुंडेंना थेट राजीनामाच द्यावा लागला. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे सध्या राजकारणात फारसे सक्रिय दिसत नाहीत. आज पक्षप्रमुख अजित दादांच्या कार्यक्रमाला जाणंही त्यांनी टाळलं. मात्र धनंजय मुंडेंनी स्वताच जाणं टाळलं की अजितदादाच सध्या मुंडेंना थोडसं दूर ठेवतायेत, याची सध्या बीडमध्ये चर्चा रंगली आहे.





Source link

महायुती सरकारने 100 दिवसांत काय काम केलं? 938 मुद्द्यांपैकी….' मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आकडेवारी!

महायुती सरकारने 100 दिवसांत काय काम केलं? 938 मुद्द्यांपैकी….' मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आकडेवारी!


CM Devendra Fadanvis On Mahayuti 100 Days: महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या महायुती सरकारने आपले 100 दिवस पूर्ण केले आहेत. या 100 दिवसांमध्ये महायुती सरकारने काय केलं? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातो. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. महायुतीच्या सुरुवातीच्या 100 दिवसांबद्दल काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? सविस्तर जाणून घेऊया. 

वक्फ सुधारणा बील मांडण्यात आलेलं असून हे बील पास होईल.याने भारतीय संविधानात सेक्युलर शब्दाचे पालन होणार आहे.  नव्या बिलाने चुका सुधारण्याची संधी दिली आहे. यात महिलांना देखील प्रतिनिधित्व मिळालं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे अतिशय पुरोगामी असे पाऊल उचलण्यात आलंय. कुठल्याही धार्मिक आस्थांविरोधात हे बील नाही. काही चुकांचा फायदा घेत होते आणि जमीनी लाटत होते. सदसदविवेकबुद्धी जागृत असलेला विरोध करणार नाही. यामुळे विरोधक जेपीसीमध्ये निरुत्तर झाल्याचेही ते म्हणाले.  सुधारणा राज्यांना विचारात घेऊन करण्यात आलेल्या आहेत. जेव्हा असं वाटतं विरोधकांनी छातीवर हात ठेवत निर्णय केला तर त्यांचा पाठिंबाच असेल. मात्र मतांच्या लांगूलचालनासाठी विरोधक हे करत आहेत. कोर्टात जाण्याची देखील मुभा यात नव्हती. मतांचे तळवे चाटण्याचे हे विरोधकांचे राजकारण आहे. त्यांची सतसत विवेकबुद्धी जिवंत असेल, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालण्याची अजूनही इच्छा असेल तर ते समर्थन देतील, असेही ते पुढे म्हणाले. 

महायुतीच्या 100 दिवसात काय काम केलं?

महायुती सरकारने पहिल्या 100 दिवसात काय काम केलं? याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय. 938 मुद्द्यांवर काम करायचं होतं. यापैकी 411 मुद्द्यांवरील काम पूर्ण झालंय. म्हणजेच 44 टक्के काम पूर्ण झालंय. 272 मुद्द्यांवर काम अर्ध झालंय. 116 मुद्द्यांवर काम अजून बाकी आहे. म्हणजे 16 टक्के काम अपूर्ण असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.  1 मे पर्यंत 16 टक्के काम पूर्ण झालं पाहिजे असं विभागांना सांगितलं आहे. यासाठी 2 आठवड्यांचा वेळ विभागांना अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दिलाय. 100 दिवसांचा काय प्लान केला होता, काय नाही झालं हे देखील विभागांना प्रकाशित करायचं आहे. म्हणजे माध्यमांपर्यंत ते देखील पोहोचेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  22 विभागांचा आढावा उद्या घेतला जाणार आहे.क्वालिटी काऊन्सिलिंग अथोरिटीला आम्ही काम दिलंय. त्यांच्याद्वारे कामाच्या गुणवत्तेचा आढावा होईल नंतर आमच्याकडे येईल त्यामुळे त्याच्या तपासणीचे काम आम्ही लगेच नाही करत. ते नंतर आमच्याकडे आल्यावर करु असेही त्यांनी सांगितले. 

काकांना आशीर्वादासाठी मर्यादीत त्यांनी ठेवलं आहे. हे तुम्हाला कोणालाच लक्षात आलेलं नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं.बीडमध्ये आता काय? तुमच्याकडे बातम्या उरलेल्या नाही त्यामुळे तुम्ही चालवत असता.सीआयडीनं विश्लेषण केलं आणि चार्जशीट द्वारे कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी संतोष देशमुख हत्येसंदर्भात बोलताना सांगितले. सरकारची भूमिका स्पष्ट आग्रह चुकीचा नाही मात्र कायदा हातात घेतला तर कायदेशीर कारवाई होईलच, असे ते यावेळी मराठी भाषेबद्दल मनसेने घेतलेल्या भूमिकेवर बोलताना म्हणाले.





Source link

मनसेचा पुन्हा मराठी बाणा; मुंबईत मराठीचा अवमान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला दिला चोप!

मनसेचा पुन्हा मराठी बाणा; मुंबईत मराठीचा अवमान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला दिला चोप!


MNS On Marathi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुन्हा एकदा मराठी बाणा पाहायला मिळतोय. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक झालेत. मराठीच्या आग्रह धरत मनसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केल्याचं पाहायला मिळालं. तर पवईत मराठीचा अवमान करणाऱ्याला मुजोर सुरक्षारक्षकाला मनसैनिकांनी चोप दिलाय.

गुढी पाढव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.मुंबई आणि पुण्यात मनसैनिक मराठीच्या मुद्द्यावर आग्रही पाहायला मिळाले.

मनसेच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बँकांमधील व्यवहार मराठीत चालतात का? हे तपासण्याचे आदेश राज्यातील मनसैनिकांनी दिले होते. त्यानंतर ठाण्यातील मनसैनिकांनी स्टेट बँकेला भेट देत. बँकेत लावण्यात आलेले हिदि फलक हटवलेत.. आणि बँकेत मराठी फलक लावण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय.

पुण्यात वाहतूक पोलिसांनी लावलेल्या इंग्रजी पाट्यांविरोधातही मनसे आक्रमक झालीय.इंग्रजी पाट्यांवरून मनसेनिकांनी पोलिसांना जाब विचारलाय. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर इंग्रजी पाट्या लावण्यात आलेत. भारतात आहोत की इंग्लंडमध्ये”? असा प्रश्न वाहतूक पोलिसांना मनसेकडून विचारण्यात आलाय.

मुंबईच्या पवईत मराठीबाबत आक्षेपार्ह विधान करणा-या सुरक्षरक्षकाला मनसैनिकांनी चोप दिलाय. मनसैनिकांनी सुरक्षारक्षकाला चोप देत माफी मागायला लावलीय. पवईतील एल अँड टी इमारतीतील एका सुरक्षारक्षकाचा एका मराठी युवकासोबत काही कारणावरून वाद झाला. यावेळी युवकाने सुरक्षारक्षकाला मराठीत बोलण्यास सांगितलं होतं. त्यावर सुरक्षारक्षकाने मराठीविषयी वादग्रस्त विधानं केली. त्यानंतर मनसैनिकांनी संबंधित सुरक्षारक्षकाला चांगलाच प्रसाद दिलाय.

दरम्यान महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे. मात्र त्यासाठी कोणी कायदा हातात घेत असेल तर कारवाई केली जाईल अशी भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारेंनी मांडलीय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेनं पुन्हा एकदा मराठीचा बाणा स्विकारल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आगामी काळात मुंबईत मराठीचा मुद्दा चांगलाच जागण्याची शक्यताय.

‘लाडकी बहीण योजना होणार बाद’; राज ठाकरेंचं भाकीत खरं ठरणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आता एप्रिल महिन्याच्या हप्ता कधी मिळणार? याबाबत महिलांना उत्सुकता लागली आहे. अशातच लाडकी बहीण योजना बंद होणार, असे भाकित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतोय.लाडक्या बहिणांना 2100 रुपये निधी केल्यास सरकारवर वर्षाला 63 हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.राज ठाकरेंच्या या भाकितावर सत्ताधा-यांनी टीका केलीये.योजनेमुळे सरकारवर ताण येतोय, हे खरंय पण लाडक्या बहिणींना आम्ही वा-यावर सोडणार नाही.उत्पन्न वाढण्यावर आमचा भर आहे असं शंभुराज देसाई, प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.’लाडक्या बहिणींना वा-यावर सोडणार नाही. 2 वर्षांत आर्थिक स्थिती भक्कम होईल, असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय.





Source link

'शंभुराजांच्या बलिदान दिनी तुमच्या टुकार कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावून…'; अभिनेत्याकडून शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याची मागणी

'शंभुराजांच्या बलिदान दिनी तुमच्या टुकार कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावून…'; अभिनेत्याकडून शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याची मागणी


Miniter Shivendra Raje Bhosale: ‘बिग बॉस’ फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बिचुकले यांनी कठोर शब्दांमध्ये आपला संपता व्यक्त करताना थेट मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंवर निशाणा साधला आहे. 29 मार्चच्या रात्री घडलेल्या एका घटनेवरुन बिचुकलेंनी संताप व्यक्त केला आहे.

29 मार्चला काय घडलं?

29 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता. त्या दिवशी शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दणदणात करून गाण्याचे कार्यक्रम केले, असं अभिजीत बिचुकलेंनी म्हटलं आहे. पुढे बोलताना, 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानात दिवशी डॉल्बी लावून गाणे वाजवत असाल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे, असंही बिचुकलेंनी घडलेल्या प्रकारावरुन टीका करताना म्हटलंय.

लज्जास्पद गोष्ट आहे

“एक गोष्ट ठणकावून सांगतो, 29 मार्च आमवस्या होती. त्या आमवस्याला आमचे छत्रपती, धर्मवीर श्रीमंत संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता. शिवेंद्रराजे मी तुम्हाला ठणकावून प्रश्न विचारतो, तुम्ही त्या राजघराण्यात जन्माला आलात याची भनक आपल्याला आहे का?” असा सवाल बिचुकलेंनी उपस्थित केला आहे. “छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या दिवशी तुमच्या टुकार कार्यकर्त्यांनी जो डॉल्बीचा दणदणाट केला, त्याला तुमचा होकार होता. नाच-गाण्याचे कार्यक्रम लागले 29 मार्चला. तुमचा वाढदिवस होता 30 मार्चला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाला तुम्ही वाढदिवस साजरा करत असाल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे छत्रपती घराण्याला आणि शिवेंद्रराजे या नावाला,” असा हल्लाबोल बिचुकलेंनी केला. 

मंत्रिपदाचा राजीनामा द्या

मंत्री शिवेंद्रराजे यांचा वाढदिवस 30 मार्चला असतो शिवेंद्रसिंहराजे तुम्ही राजघराणात जन्माला आला त्याची तुम्हाला किंमत आहे का? असा सवालही बिचुकलेंनी उपस्थित केला. “छत्रपतींची वैचारिक वारस म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाला तुम्ही जो डॉल्बीचा जो दणदणाट केला याची जाणीव असेल तर तुम्ही आता मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या. छत्रपतीच्या घरात जन्माला येऊन तुम्ही संभाजी महाराजांचा अपमान करता. अरे, 30 मार्चला तुम्ही काहीही केलं असतं तर मी काही बोललो नसतो. दुसरी गोष्ट पत्रकारांकडून कळली की तुम्ही अनधिकृत बॅनर लावले आहेत. हा पहिला वाढदिवस तुम्ही एवढा मोठा साजरा करता कारण तुम्हाला मंत्रिपद मिळालं, हे नशीब समाजा. तुमच्या या यशामध्ये अभिजित बिचुकलेचा फार मोठा वाटा आहे, वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी येतील बाहेर,” असं बिचुकलेंनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे. 





Source link

फक्त 50 रुपयासाठी पोलिस खात्याची नोकरी गमावली; जळगावमध्ये तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन

फक्त 50 रुपयासाठी पोलिस खात्याची नोकरी गमावली; जळगावमध्ये तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन


No match is being played.

Mar 31, 2025 | Match 12

Indian Premier League, 2025

MI

(16.2 ov) 116

VS

KKR

121/2(12.5 ov)

Mumbai Indians beat Kolkata Knight Riders by 8 wickets
Full Scorecard →

Mar 31, 2025 | Match 12

Indian Premier League, 2025

KKR

(16.2 ov) 116

VS

MI

121/2(12.5 ov)

Mumbai Indians beat Kolkata Knight Riders by 8 wickets
Full Scorecard →

Mar 30, 2025 | Match 11

Indian Premier League, 2025

CSK

(20 ov) 182/9

VS

RR

176/6(20 ov)

Rajasthan Royals beat Chennai Super Kings by 6 runs
Full Scorecard →





Source link

फडणवीस मोदींचे वारसदार? राऊतांचं सूचक विधान; स्वत: फडणवीस म्हणाले, '2029 मध्ये…'

फडणवीस मोदींचे वारसदार? राऊतांचं सूचक विधान; स्वत: फडणवीस म्हणाले, '2029 मध्ये…'


Devendra Fadnavis on being Narenra Modi Heir: संघ नरेंद्र मोदींचा वारसदार ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तुमचं नाव घेतल्यासंबंधी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्षं नरेंद्र मोदी काम करणार आहेत. आमचा सर्वांचा आग्रह आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही”. 

नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार? संजय राऊतांचं मोठं विधान, ‘सरसंघचालक भागवतांनी त्यांना 75 वर्षं पूर्ण झाल्यानंतर…’

पुढे ते म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही मुघली संस्कृती आहे. तिथे वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचे विचार करतात. सध्या कोणताही उत्तराधिकारी निवडण्याचा प्रश्न नाही”. 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“नरेंद्र मोदी-मोहन भागवत यांच्या भेटीचे संकेत स्पष्ट आहेत. नरेंद्र मोदी यांनी 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये असं धोरण जाहीर केलं होतं. त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना त्यांच्या भूमिकेची आठवण करुन देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. सप्टेंबर महिना येत असून, देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. दुसरीकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही संघाची एक भूमिका असल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपाच्या अध्यक्षपदी यावी अशी संघाची भूमिका स्पष्ट दिसत आहे”,  असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

‘…तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे’, संजय राऊतांचं मोठं विधान

 

“मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं दिसत आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते. बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर येत नाही. पण काही संकेत स्पष्ट असतात. संघ पुढील नेता ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल,” असंही ते म्हणाले. 

राज ठाकरेंच्या भाषणावर मांडली भूमिका

दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी भाषणात मांडलेल्या मुद्यांवरही भाष्य केलं. राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांची मदत आणि विश्वासात घेऊन राज्य चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणे हे आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांन सांगितलं. मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, 100 टक्के जे नियमाच्या बाहेर असतील आणि सुप्रीम कोर्टांचा जो आदेश आहे या आदेशाचे तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल.

राज ठाकरेंनी औरगंजेबाच्या कबरीसंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर ते म्हणाले, “ही जी कबर आहे तिला एएसआयचं संरक्षण आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो, कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी त्या कबरीला संरक्षण दिलं आहे. म्हणून त्या ठिकाणी कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे. पण कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही”.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp