Raj Thackeray On Shivsena : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena Symbol) अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं. त्याचबरोबर आता शिवसेना नाव देखील वापरता येणार नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संकटात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता मनसेने (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणावर ट्विट केलं आहे.

ठाकरे-शिंदे वादात मनसेने सावध भूमिका घेतल्याचं दिसत आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणातील व्हिडीओ व्हायरल करण्यात येत होता. वारसा हा कोणता असतो?, वारसा हा वास्तूचा नसतो, वारसा हा विचारांचा असतो, असं राज ठाकरे या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. अशातच आता राज ठाकरे (Raj Thackeray Tweet यांनी मनसैनिकांसाठी मनाई आदेश दिलाय.

काय म्हणाले Raj Thackeray ?

सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांच्या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूमिका उंचावल्या आहेत.

पाहा ट्विट- 

 

संदीप देशपांडे यांचं ट्विट –

उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब, भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्वीट करुन शिवसेनेवर केली होती.

दरम्यान, शिवसेनेतील या बंडाचा सर्वात मोठा फायदा हा मनसेला होण्याची शक्यता आहे. अनेक शिवसैनिकांनी राज ठाकरे यांना यांच्याशी हातमिळवणी केली होती. तर दुसरीकडे भाजपसोबत युतीसाठी मनसेने मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे आता राज ठाकरे सध्याच्या परिस्थितीवर काय बोलणार?, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.





Source link