Marriage : शेकडो नवरदेवांना लग्नाच्या मंडपातच मिळाला धोका

Marriage : शेकडो नवरदेवांना लग्नाच्या मंडपातच मिळाला धोका


पुढील
बातमी

भाच्याने कट रचला पण मामीचा जीव गेला… पोलिसांनी फेसबुकवरुन लावला आरोपींचा शोध





Source link

Crime News : शिवीगाळ करत भांडण काढलं मग चिमट्याने… पुण्यातील ‘त्या’ हत्येचे कारण आले समोर

Crime News : शिवीगाळ करत भांडण काढलं मग चिमट्याने… पुण्यातील ‘त्या’ हत्येचे कारण आले समोर


निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्याच्या (Pune News) वेल्हा तालुक्यात झालेल्या खुनाला धक्कादायक वळण लागलंय. पुण्याच्या (Pune Crime) अप्पा बळवंत चौकातील कन्या शाळेजवळील विजय लॉज बिल्डींगमध्ये राहणार्‍या व्यक्तीचा पानशेतजवळील आंबीगाव रस्त्यावरील कुरण गावच्या हद्दीतील रानवडी येथे लोखंडी सळईने खून करण्यात आल्याचे म्हटले जात होते. वेल्हे पोलिसांच्या (Velhe Police Station) सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा उलघडा केला आहे.

सोन्या, चांदीच्या हव्यासापोटी मित्रांनीच मित्राला संपवल्याच पोलीस तपासात समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आली असून, आरोपींकडून सोन्याचांदीचे दागीन्यांसह 1,83,76, 165 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी वेल्हा तालुक्यातील पानशेतजवळ विजय काळोखे या व्यक्तीचा लोखंडी रॉड डोक्यात मारून आरोपींनी खून केला असे सांगण्यात येत होते.

विजय प्रफुल्ल काळोखे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  वेल्हे पोलिसांनी याप्रकरणी नितीन रामभाऊ निवंगुणे आणि विजय दत्तात्रय निवंगुणे यांच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. आरोपींविरुध्द वेल्हे पोलीस ठाण्यात खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींकडून पावने दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

वेल्हा तालुक्यात पानशेत जवळ काही दिवसांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन भावांनी एका व्यक्तीचा लोखंडी रॉड, वीट आणि लोखंडी वस्तू डोक्यात मारून खून केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी घर बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात पुरला होता. मात्र आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबधित व्यक्तीकडे असणाऱ्या सोन्या चांदीच्या हव्यासापोटी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. वेल्हा पोलिसांनी या घटनेचा समांतर तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 1,83,76, 165 रूपयांचा सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वेल्हा पोलिसांनी नितीन रामभाऊ निवंगुणे, विजय दत्तात्रय निवंगुणे,ओमकार नितीन निवंगुणे आणि आणखी एक अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

मृत पावलेल्या विजय काळोखे घरातून सोबत सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन निघाले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. वेल्हे पोलिसांनी त्यानुसार घटनेचा तपास सुरू केला. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी नितीन निवंगुणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने उडवा उडविची उत्तरे दिली होती. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटना क्रम सांगितला.

विजय काळोखे हा सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेवून निघाल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. काळोखे जवळील ऐवज  लुटण्याच्या प्रयत्नात आरोपींनी संतोषनगर कात्रज येथे स्टिलच्या चिमटयाने मयत विजय प्रफुल्ल काळोखे याचे डोक्यात आणि तोंडावर वार करुन त्याचा खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी विजय काळोखेचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरलमध्ये टाकला. हा बॅरल इनोव्हा कारमध्ये टाकून तो मौजे रानवडी येथे आरोपी नितीन निवंगुणे याच्या शेतजमीनीच्या ठिकाणी आणला. आरोपी विजय दत्तात्रय निवंगुणे याच्या सहाय्याने तो मृतदेह खड्डयात पुरण्यात आला. 





Source link

राष्ट्रवादीच्या कार्यालयात ‘पतली कमरीया’वर रिल… टीका करणाऱ्याला रुपाली ठोंबरे यांचं उत्तर

राष्ट्रवादीच्या कार्यालयात ‘पतली कमरीया’वर रिल… टीका करणाऱ्याला रुपाली ठोंबरे यांचं उत्तर


Rupali Thombre : सोशल मीडियावर (Social Media) अनेक रिल्स बनत असतात. एखाद्या गाण्यावर ट्रेंड (Trend) आला की तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतो. सध्या सोशल मिडियावर भोजपुरी गाणं (Bhojpuri Song) ‘पतली कमरिया तेरी’ या गाण्यावर लेटेस्ट डान्स ट्रेंड आहे. अनेकांनी या गाण्यावर रिल्स (Reels) बनवत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याच गाण्यावर डान्स करण्याचा मोह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला कार्यकर्त्यांनाही आवरला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे इथल्या कार्यालयात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम संपल्यावर महिला कार्यकर्त्यांनी ‘पतली कमरिया’ या गाण्यावर रिल्स बनवला.

रिल्सवर झाली टीका
पण या रिल्सवरती काही जणांकडून  टीका होतेय. प्रवीण अलई (Pravin Alai) नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने खिल्ली उडवली आहे. या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘काय पुणे इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय? अरे काय हा डान्स… राजकीय पक्षाच्या महिला भगिनींना हे अशोभनीय म्हणावे, की पक्षाचा अजेंडा? राष्ट्रवादी पक्षाचे कार्यक्रम आणि बाकी सगळं भारी चाललंय…!’ अशी टीका प्रवीण अलई नावाच्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये केलीय. तसंच पुढे त्याने ‘आवरा आणि पक्षाला सावरा’ असंही म्हटलं आहे. ही पोस्ट या व्यक्तीने भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनाही टॅग केली आहे. 

रुपाली ठोंबरे यांचं जोरदार उत्तर
मकर संक्रांतीनिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं व्हिडिओवरुन दिसतंय. व्हिडिओत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांच्या नावाचा बॅनरही दिसतोय. प्रवीण अलई नावाच्या व्यक्तीने व्हिडिओ ट्विट करत टीका केल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. 

हा कोण हरामी भिकार विचारांच्या… हे आमचे ऑफिस आमच्या मालकीचे आहे आमचा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यावर आम्ही कोणत्या गाण्यावर डान्स करायचा हे आमचे स्वातंत्र्य आहे. तुझ्या सारख्या विचारांच्या लोकांमुळे महिला सुरक्षित स्वातंत्र्य नाहीत अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. याचबरोबर आयुष्य, समाज घाण घडवणे एकच कार्यक्रम भाजपचा’ अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

दरम्यान, प्रवीण अलई याने केलेल्या या पोस्टवर त्यालाच ट्रोल करण्यात येत आहे. कोणी काय करावं हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रश्न असल्याचं लोकांनी सुनावलं आहे. 





Source link

Santosh Bangar : शिंदे गटाचे आमदार अडचणीत, संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Santosh Bangar : शिंदे गटाचे आमदार अडचणीत, संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल


Santosh Bangar : शिंदे गटाचे आक्रमक आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) चांगलेच अडचणीत आले आहे.  (Maharashtra Political News) आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Updated: Jan 28, 2023, 08:55 AM IST





Source link

Adenoviruses : पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी; Adenoviruses चे थैमान, मुलांच्या आरोग्याला धोका

Adenoviruses : पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी; Adenoviruses चे थैमान, मुलांच्या आरोग्याला धोका


विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात एकीकडे कोरोना व्हायरसची दहशत असतानाच पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुलांच्या आरोग्याकडे (health of children) अधिक लक्ष देण्याची गरज आहे.  कारण RSV, H3N2, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे.  संभाजी नगरमध्ये (Sambhajinagar) या व्हायरसने थैमान घातले आहे. बाल रुग्णालये फुल्ल झाली आहेत.

RSV (Respiratory Syncytial Virus), Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरसमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुलांना तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास, खोकला, आदी लक्षणे दिसत आहेत. ही लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवा, असं आवाहन केले जात आहे. हिवाळ्यात लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहेत. मुख्यत: श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण सौम्य ते मध्यम स्वरुपाचे आहेत.

काय आहे हा Adenoviruses?

अॅडिनोव्हायरस हा एक विषाणू आहे जो श्वासनलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर वाढतो. या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो. या विषाणूचे डझनभर प्रकार आहेत परंतु या उद्रेकामागे एडेनोव्हायरस 7 असल्याचे म्हटले जाते. एडेनोव्हायरस 7 विशेषतः धोकादायक आहे आणि त्यामुळे न्यूमोनियासह मोठ्या श्वसनाच्या गुंतागुंत होऊ शकतात

एडेनोव्हायरसमुळे मृत्यू होत नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांवर हा विषाणू परिणाम होतो. RSV, Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरस पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेणं टाळा.  पौष्टिक आहार द्या.. स्वच्छतेचे नियम पाळा. लहान मुलांना हात धुण्याची सवय लावावी. इन्फ्लुएंजाची लस घेणं आवश्यक आहे.

यातील RSV हा व्हायसर हा एक वर्षाखालील मुलांना त्रास देतो. तर Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus व्हायरसमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे एक वर्षाच्या बाळापासून ते दहा वर्षांच्या मुलांमध्ये दिसत आहेत. या चार व्हायरसपासून आपल्या मुलांना सांभाळा. 

या चारही व्हायरसचा प्रसार हवेतून होतो. यातील Influenza A (H3N2) Variant Virus आणि Adenoviruses हे व्हायरस मुलांना अधिक त्रासदायक आहेत. त्यामुळे मुलांची काळजी घ्या, असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असंही डॉक्टरांनी सांगितले.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp