by Hansraj Agrawal | Oct 9, 2022 | Trending News
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन झालं. शिवसेना (Shivsena) पक्षासोबतच धनुष्यबाण या चिन्हावर देखील शिंदे गटाने दावा केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) नुकताच एक महत्वाचा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवलं आहे.
शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल” असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन शिवसेनेला टोला लगावला आहे.
त्यासोबतच, “संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्हही. कालाय तस्मै नम:” असं देखील संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासमोर केलेल्या भाषणातील एक व्हिडीओ क्लिप ट्वीट केली. या क्लिपमध्ये “माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, नाव असलं काय नसलं काय. मला फरक पडत नाही. कारण माझ्याकडे विचार आहेत”, असं म्हणताना राज ठाकरे दिसत आहेत. ‘वारसा वस्तूचा नसतो, विचारांचा असतो’ असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई महानगरपालिके सोबतच राज्यातील इतर काही महापालिकेच्या निवडणूका आणि पोटनिवडणूकीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मतदारांची सहानुभूती मिळू नये या दृष्टीकोणातून मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी हे ट्विट केलं असण्याची शक्यता आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 8, 2022 | Trending News
Shivsena : राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात महत्त्वाची घडामोड आज घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या संकटात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले खासदार अरविंद सावंत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागलंय ते पाहता ते सध्या वेठबिगार झाले आहेत. कुणीतरी तक्रार केली पण त्याची छाननी केली गेली नाही, असा आरोप सावंत यांनी केलाय. आम्ही कागदपत्रं दिली त्याची छाननी नाही, निवडणूक आयोग कुणाच्या आदेशानं वागतंय, बापाचं नाव बापच असतं, निवडणूक आयोग आमचा बाप नाही, ते तर वेठबिगार असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केलाय.
भारताची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. कुणीही काहीही सांगेल आणि तुम्ही निर्णय घेता, असं म्हणत सावंत यांनी खडे बोल सुनावले आहेत. शिंदे गटाचा एक माणूस सांगतो पाच वर्ष निर्णय लागणार नाही, अख्खा महाराष्ट्र सगळे डोळं उघडे ठेवून पाहतोय, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
“शिवसेना आमच्या बापाचं नाव”
हिंदूह्रदयसम्राट शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली पक्ष उद्धव ठाकरे यांनी पक्ष पुढं चालवला आहे, असं म्हणत अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. शिवसेना हे आमच्या बापाचं नाव आहे, ते कुणीही आलं तरी काढून घेऊ शकणार नाही, असं अरविंद सावंत म्हणाले.
आणखी वाचा- धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटापुढे ‘या’ चिन्हांचा पर्याय, वाचा सविस्तर
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या 1968 मधील पक्ष चिन्हाच्या ऑर्डरनुसार आज निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपर्यंत नव्या चिन्हाची निवड करण्याची मुदत निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला दिली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 8, 2022 | Trending News
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी (crime) वाढत असून हत्याकांडाच्या (massacre) घटनांतही सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात 2 हजार 330 हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. मात्र यातील सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून (Immoral relationship) घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेले पुणे (Pune) शहर अनैतिक संबंधातून घडणाऱ्या हत्याकांडांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. (Pune ranks first in the crime of immoral relationship)
पुण्यात (Pune)अनैतिक संबंधातून सर्वाधिक 10 हत्याकांड घडले आहेत. तर नागपुरात (Nagpur) 7 हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार आहे. मुंबईत (Mumbai) मात्र केवळ 3 हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याची नोंद आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या हत्याकांड राज्यात पुणे (Pune) शहर पहिल्या स्थानावर आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्यावर्षी 2 हजार 330 खुनाच्या घटना घडल्या आहेत. हत्याकांड घडण्यास अनेक कारणे जबाबदार आहेत. त्यात जुने वैमनस्य, राजकीय द्वेष, युवक-युवतीमधील प्रेमसंबंध, विवाहित महिला व पुरुषांचे असलेले अनैतिक संबंध, दरोडा टाकताना केलेला विरोध, धार्मिक तेढ, कौटुंबिक वाद, संपत्तीच्या वादासह अन्य कारणांचा समावेश आहे.
अनैतिक संबंधातून घडलेले गुन्हे
राज्य – खून
महाराष्ट्र – 232
आंध्रप्रदेश – 186
मध्यप्रदेश – 161
कर्नाटक – 152
तामिळनाडू – 140
दरम्यान, पत्नीचे अन्य पुरुषांशी किंवा पतीचे अन्य विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून सर्वाधिक हत्याकांड राज्यात घडले आहे. पत्नीचे प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत पतीला कुणकुण लागल्यामुळे खून केल्याच्या घटनांमध्येसुद्धा गेल्या वर्षांत वाढ झाल्याची नोंद आहे
Source link
by Hansraj Agrawal | Oct 7, 2022 | Trending News
आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : बँक मॅनेजरनं कट रचून आपल्याच बँकेवर दरोडा घातला आणि तब्बल 34 कोटी लंपास केले. डोंबिवली MIDC च्या ICICI बँकेत काम करणाऱ्या अल्ताफ शेखनं वेबसिरीज पाहून वर्षभरापासून आपल्याच बँकेवर दरोडा घालण्याचा कट रचला. त्यात तो यशस्वीही झाला. अल्ताफ शेखनं इतक्या शिताफीनं प्लानिंग केलं होतं की दरोड्याचा तपास करायला पोलिसांना तब्बल दोन महिने लागले. अल्ताफ स्वत: कॅश कस्टडियन असल्यानं त्याला सुरक्षा यंत्रणांची खडानखडा माहिती होती. त्याची प्लानिंग पाहून तुम्हीही थक्क व्हाल
असा रचला दरोड्याचा कट
– अल्ताफने सुरक्षा यंत्रणांतील त्रुटींचा अभ्यास केला
– सुट्टीच्या दिवशी काम करत बँकेचे सर्व अलार्म निष्क्रिय केले
– सर्व कॅमेऱ्याच्या हार्ड डिस्क काढल्या
– सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला
– बँकेच्या तिजोरीतील तब्बल 34 कोटींवर डल्ला मारला
– 34 कोटी रोकड ताडपत्रीत बांधली
– एसी डक्टमधील छिद्रातून ताडपत्री बँकेच्या मागच्या बाजूला फेकली
– मित्रांच्या मदतीनं 34 पैकी 12 कोटी लंपास केले
– नवी मुंबईत एक घर भाड्यानं घेऊन त्यात सारी कॅश ठेवली
त्यानंतर अल्ताफनं स्वत:च बँकेवर दरोडा पडल्याची माहिती वरिष्ठांना दिली आणि मानपाडा पोलिसांना तक्रार दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करायला लागले. तब्बल अडीच महिन्यांनंतर अल्ताफचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी अल्ताफसह कुरेश, अहमद खान आणि अनुज या त्याच्या तीन साथीदारांना तसंच त्याची बहिण निलोफरला बेड्या ठोकल्यात. 34 कोटींपैकी 22 कोटी एसीच्या डकमध्येच होते. तर 12 कोटी अल्ताफ आणि त्याच्या साथीदारांकडून रिकव्हर करण्यात आलेत. काही रक्कम बँकेच्या जिन्याच्या खाली ठेवण्यात आली होती.
सिनेमा आणि वेबसीरिज पाहून चोरांनी दरोडा घालण्याच्या घटना तशा नव्या नाहीत. मात्र मॅनेजरनं सिनेस्टाईल आपल्याच शाखेत एवढी मोठी रक्कम लुटण्याची ही पहिलीच घटना असेल. आता बँकेचे मॅनेजरही दरोडा घालायला लागले तर जनतेनं पैसे ठेवायचे कुठे? असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 7, 2022 | Trending News
आमदार भरत गोगावले यांनी या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे म्हटलं आहे
Source link
by Hansraj Agrawal | Oct 6, 2022 | Trending News
पुढील
बातमी
CCTV VIDEO : रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यांची तरुणाला मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!
Source link