R-Day: President lauds Constitution


गेलं वर्षभर राजकीय राड्यांनी विश्रांती घेतल्यानंतर काल पुन्हा एकाद कणकवलीत राडा पाहिला मिळाला. हमरी तुमरी, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं
Updated: Jan 25, 2023, 09:19 PM IST
Long Weekend Tourists Destinations : वर्षातली सर्वात पहिली मोठी सुट्टी चालून आली आणि नोकरदार वर्गाचा आनंद गगनात मावेनासा झाला. साचेबद्ध नोकरी, कामं करून कंटाळलेल्या सर्वांनीच मग बेत आखण्यास सुरुवात केली एखाद्या अशा ठिकाणी जायची, जिथं चार दिवस कुणाचीही अडचण होणार नाही. तुम्ही या सुट्टीसाठी काय प्लान करताय? काहीच नाही? असं कसं चालेल? (best places to visit in a long weekend )
सुट्टी चालून आलिये, त्यामुळं महिना अखेर असली तरीही पैशांची जुळवादजुळव सहज शक्य आहे. रोजच्या आयुष्यातून काहीशी वेगळी वाट निवडा आणि हाकेच्या अंतरावर असणाऱ्या, खिशाला परवडणाऱ्या काही खास ठिकाणांना नक्की भेट द्या.
जोडून आलेली सुट्टी म्हटलं की अनेकांचेच पाय अलिबागकडे वळतात. म्हणजे मुंबई- पुण्यातून तरी इथं अनेकजण येतात. पण आता तिथंही वाढणारी गर्दी पाहता अलिबाग म्हटलं तरी नको रे बाबा असा सूर अनेकजण आळवतात. अशा मंडळींसाठी (Revdanda) रेवदंड्याच्याही पुढे असणारा (Chikni beach) चिकनीचा समुद्रकिनारा, मुरूड (Murud) ही टुमदार गावं चांगले पर्याय ठरतील. किफायतशीर राहण्याची सोय आणि चवीष्ट जेवण देणाऱ्या खानावळी इथं तुमच्या गरजा भागवतील. इथं असणारी पाटील खानावळ सध्या प्रचंड चर्चेत असून, इथल्या Fish Thali वर अनेकजण उभाआडवा ताव मारतात. तिथूनच पुढे (Srivardhan) श्रीवर्धनचा किनाराही बऱ्याच अंशी निर्मनुष्य असल्यामुळं हा पर्यायही तुम्ही पाहू शकता. आगरदांडा (Agardanda) इथं असणारे काही पर्यायही तुमच्यासाठी खुले असतील. प्राधान्यानं तुम्ही इथं स्वत:च्या वाहनानं आलात तर आजुबाजूची पर्यटनस्थळं फिरताही येतील.
थोडं खुद्द कोकण किनारपट्टीकडे जायचं झाल्यास तुम्ही निवती (Nivti) येथे जाऊ शकता. Mainstream कोकण (Konkan) पासून काहीसं Offbeat जायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. माणसांचा कल्ला नाही, उगचची गर्दीही नाही. त्यामुळं निवतीला येऊन तुम्ही चार दिवस निवांत राहू शकता. इथं तुम्हाला किमान पैशांमध्ये राहण्याखाण्याची सोय उपलब्ध असेल. किनाऱ्यालगत राहण्याची इच्छा असेल तर मात्र काहीसे जास्त पैसे मोजण्यासाठी तयार राहा.
(Mahabaleshwar) महाबळेश्वरमध्ये सध्या हवामानानं सुरेख रुप धारण केलं आहे. हो पण, तिथं जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. परिणामी तिथं हॉटेल्सचे दरही गगनाला भिडले आहेत. तुम्ही हिरमोड करुन घेऊ नका, कारण महाबळेश्वर नही तो वाई (Vai) सही… असं म्हणत तुम्ही धोम धरणाच्या आजुबाजूचा परिसर नव्यानं पाहू शकता. इथं अनेक ठिकाणी रिसॉर्ट्सची उत्तम सोय करून देण्यात आली आहे. (Satara) सातारा- महाबळेश्वर रस्त्याला असताना पाचगणीचा (Panchgani) घाट सुरु होतानाच पायथ्याशी असणाऱ्या सिद्धगिरी हॉटेलमध्ये (Hotel Siddagiri) गरमागरम मटण- चिकन थाळीवर (Mutton Thali, Chicken Thali) ताव मारा आणि मगच पुढच्या प्रवासाला निघा.
डोंगर, दऱ्यांच्या वातावरणात रममाण होऊ इच्छित असाल, तर पाचगणी (Panchgani), भोसे (Bhose), भिलार (Bhilar) हे पर्यायही तुम्ही निवडू शकता. इथं अनेक स्थानिकांनी त्यांच्या घराला लागूनच पर्यटकांसाठी काही राहण्याच्या व्यवस्था उपलब्ध करून दिल्या आहेत. (Strawberry Farming) स्ट्रॉबेरीची शेती तुम्ही इथं अगदी जवळून पाहू शकता. सरासरी पाच ते सहा तासांचा प्रवास करून तुम्ही या नयनरम्य ठिकाणांवर पोहोचू शकता. खासगी वाहन किंवा लाल परी अर्थात एसटी तुम्हाला इथं सोडू शकते.

अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणाऱ्या राजूरलाही (Rajur) तुम्ही भेट देऊ शकता. इथं काही दिवसांपासून Camp on Wheels ही एक नवी संकल्पना सुरु करण्यात आली आहे. जिथं तुम्ही कॅम्परव्हॅनमध्ये (Campervan) राहण्याचा आनंद घेऊ शकता. काहीशा उंचीवर असणाऱ्या सुरेख अशा पठारावर असणाऱ्या या अनोख्या ठिकाणहून तुम्हाला निसर्गाची साद अगदी सहज ऐकू येईल. इथं तुम्ही स्वत:ला हवं तसं जेवणही बनवू शकता बरं. कमाल आहे ना!
जोडून आलेल्या सुट्टीमध्ये एखादा दिवस वाढवलात तर तुम्ही राज्याच्या सीमा ओलांडून कधीही न पाहिलेल्या पर्यटनस्थळांनासुद्धा भेट देऊ शकता. इथं मात्र तुम्हाला खर्चाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. कारण, राज्य ओलांडत असल्यामुळं प्रवास आणि तिथं राहण्याच्या सोयींसाठी बराच आटापिटा करावा लागेल. त्यातही शेवटच्या क्षणी बेत आखत असाल तर जरा काळजीच घ्या.
![]()
तर, महाराष्ट्राबाहेर फिरण्यासाठी निघण्याच्या बेतात आहात? हंपी (Hampi), गोकर्ण (Gaokarna), नेत्रावली (गोवा) (Netravali – Goa) यापैकी एखादा पर्याय तुम्ही निवडू शकता. शेवटच्या क्षणी बस, रेल्वे किंवा विमानाचं तिकीट बुक होणं काहीसं कठीण असेल. पण, तुम्ही स्वत:चं वाहन असेल तर थेट बॅगा भरून प्रवासच सुरु कराल. सोशल मीडिया आणि युट्यूबवर सध्या या प्रत्येक ठिकाणची थोडीथोडकी ते अगदी सविस्तर माहितीही उपलब्ध आहे. त्यामुळं तुम्ही फक्त ठिकाण निवडा आणि सुटा…. !
शिंदे गटाचे हिंगोलीतील बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) नेहमीच चर्चेत असतात. बांगर यांनी अधिकाऱ्यांसह अनेकांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे तसेच धमक्या देखील दिल्या आहेत. आता त्यांनी थेट कॉलेजच्या प्राचार्यांसह गैरव्यहार केला आहे.
Updated: Jan 24, 2023, 10:24 PM IST
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : देशाने स्वातंत्र्याची पंच्यात्तरी ओलांडली तरी जाती पातीमुळे होणारे अत्याचार 21 व्या शतकातही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही (Maharashtra News) हा प्रकार सर्रास सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. श्री गौड ब्राह्मण समाजाच्या (Sri Goud Brahmin Caste Panchayat) जातपंचायतीने सामाजिक बहिष्काराची भीती दाखवल्याने 400 मुलांची लग्नच होत नसल्याची (400 marriages stopped ) धक्कादायक बाब समोर आहे. जात पंचायतीच्या धाकामुळे तरुणांची लग्ने रखडल्याने त्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे आता जातपंचायतीच्या या मनमानी कारभाराविरोधात पुण्याच्या (Pune News) बिबेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत तक्रार दाखल
आंतरजातीय विवाह, पुनर्विवाह यांना कायदेशीर मान्यता असताना देखील जात पंचायतीच्या मनमानीमुळे श्री गौड ब्राह्मण समाजातील तब्बल ४०० विवाह रखडले आहेत. समाजातून कुटुंबांना बहिष्कृत करणे, दंड ठोठावणे असे बेकायदेशीर प्रकार जात पंचायतीकडून सर्रास चालू असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आता थेट पोलिसांत धाव घेतली असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळीत टाकल्यामुळे कुटुंबातील इतर मुलांची लग्न रखडली
श्री गौड ब्राम्हण समाजात मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने मुलांना लग्नासाठी मुलीचं मिळत नाहीत. त्यामुळे अनेक मुलांनी पोटजातीत किंवा आंतरजातीय लग्न करत आपला जोडीदार निवडला आहे. त्यानंतर या समाजाच्या जातपंचायतीने त्यांच्या पूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. समाजातून वाळीत टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर मुलांची लग्न होत नाहीयेत. तसंच कुठल्याही नातेवाईकांच्या मंगल कार्यात अथवा दुःखद प्रसंगी त्यांना सहभागी होऊ दिले जात नाही. त्यामुळे केवळ जात पंचायतीच्या मनमानी कारभारामुळे या कुटुंबांना हा त्रास सहन करावा लागत आहेत. यातून बाहेर पडता यावं यासाठी बहिष्कार टाकलेल्या कुटुंबांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मदतीचा हात मागितला होता. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुणे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातीत पुन्हा घेण्यासाठी लाखोंचा दंड
दरम्यान, याप्रकरणी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली होती. यावेळी बोलताना मुक्ता दाभोळकर यांनी याबाबत माहिती दिली होती. “महाराष्ट्रात काही हजार श्रीगौड ब्राह्मण कुटुंबे आहेत. त्यांपैकी विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांनी जातीबाहेर विवाह केले होते. त्यानंतर जातपंचायतीकडून त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. त्यांना पुन्हा जातीत सामावून घेण्यासाठी लाखो रुपये दंड आकारला जातो. अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र अंनिसकडे आल्या आहेत. या मनमानीमुळे अनेक कुटुंबांचे शोषण झाले आहे,” असे मुक्ता दाभोळकर यांनी म्हटले होते.
Online Frauds: विष्णू बुरगे, झी 24 तास: ऑनलाईन (Online Shoping) वस्तू खरेदीच्या नावावर अनेकांची फसवणूक (Frauds) होत असते. अशातच बीडमधील (Beed News) धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन बैल खरेदी करण्याच्या बहाण्याने चक्क एका शेतकऱ्याला सायबर भामट्यांनी 95 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. त्यानंतर बीडमध्ये एकच चर्चा होताना दिसत आहे. (beed online frauds 95000 was grabbed from a farmer by posting an advertisement on facebook to sell a pair of bullocks marathi news)
झालं असं की, कारी गावचे ज्ञानेश्वर फरताडे असं या शेतकऱ्याचे नाव असून फेसबुकवर त्यांनी ऑनलाईन बैलांची जोडी (Pair of bulls online Shoping) बुक केली. त्यानंतर समोरच्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून वेगवेगळ्या कामासाठी 95 हजार रुपये आपल्या खात्यावर टाकायला सांगितले. शेतकऱ्याने विश्वास ठेऊन पैसे पाठवले. मात्र…
शेवटी बैल जोडी न मिळाल्याने आपली फसवणूक (Online Frauds) झाल्याचा त्यांच्या लक्षात आल्यानंतर बीडच्या सायबर पोलिसात अज्ञात चौघाजणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी ऑनलाईन व्यवहार करताना फसला आणि मोठी किंमत त्याला चुकवावी लागली.
बैल जोडी घेण्यासाठी अनेकजण बाजाराची वाट धरतात मात्र लंबी (Lampi) आजारामुळे बीड जिल्ह्यासह जवळपासच्या सर्वच शहरातील बाजार बंद असल्यामुळे या शेतकऱ्यांना ऑनलाइनच बैलजोडी घ्यायचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलेली आहे.
शेतकरी बैल जोडी घेताना त्याला दात आहेत का त्याचा रंग रूपाशिवाय बैलाची शरीरवृष्टी हे सर्व पाहून बैलाची खरेदी करतात मात्र या शेतकऱ्यांना फोटो मधीलच बैलांची शरीर वृष्टी पाहिली आणि बैल घेण्याचा निर्णय घेतला मात्र या शेतकऱ्याचा त्याने घेतलेला हा निर्णय त्याच्या चांगलाच अंगलट आला.
अनेकजण ऑनलाईन व्यवहार करण्याच्या नादात आणि फेसबुक व्हाट्सअप आणि इतर सोशल माध्यमांवर येणाऱ्या जाहिरातीला बोलून अनेक जण व्यवहार करतात आणि व्यवहार करताना कुठलीही शहानिशा करत नाहीत त्यानंतर अनेकांची फसवणूक होते.
दरम्यान, फसवणुकीनंतर पोलिसांमध्ये (Cyber Crime) धाव घेतात मात्र अनेक हे सायबर ठग पहिल्यांदा वेगवेगळी आमिष दाखवतात आणि आम्हीच दाखवून पैशाची मागणी करून लूट करतात त्यामुळे सर्वाधिक सावधान होण्याची गरज आहे आणि जरी एखादी वस्तू आवडलीस तर पहिल्यांदा ती मागवावी आणि नंतरच आर्थिक व्यवहार करावा असं देखील तज्ञ व्यक्तींकडून सांगण्यात येतं. अशा भूलथापांना आणि सोशल मीडियातील खरेदी व्यवहार करताना शहानिशा करूनच व्यवहार करावेत असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.