MLA Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत अलर्ट जारी!

MLA Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत अलर्ट जारी!


Maharastra Politics: निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांना अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. जर जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरीदेखील पूर्ण क्षमतेने आपल्याला या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचा (NCP) प्रयत्न असणार आहे.


Updated: Feb 1, 2023, 08:03 PM IST





Source link

Crime News : कुत्र्याचा खून थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय घडल?

Crime News : कुत्र्याचा खून थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय घडल?


पुढील
बातमी

Crime News : या जन्माची पापं इथेच फेडावी लागतात, मृतदेहाचा बंदोबस्त करताना आरोपीचाच जीव गेला





Source link

देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो, प्रकाश आंबेडकरांचा दावा

देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो, प्रकाश आंबेडकरांचा दावा


Prakash Ambedkar Interview: सत्तेत बसणं आणि अजेंडा ठरवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar) यांनी केला आहे. ‘झी 24 तास’चा विशेष कार्यक्रम ‘Black and White’मध्ये चे मुख्य संपादक निलेश खरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी दलित चळवळ (Dalit Movement), पुढील राजकीय वाटचाल, समोरील आव्हानं, भाजप (BJP) अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मतं मांडली.

दलित चळवळ आणि नेतृत्त्व गेल्या 60 वर्षात राजकीयदृष्ट्या यशस्वी होताना दिसत नसल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले “किती आमदार आणि खासदार यावर आम्ही यश मोजत नसून, आम्ही मानलेला अजेंडा देशाचा झाला की नाही हे पाहत आहोत. आमच्या मताप्रमाणे या देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्यामागे इतर राजकीय पक्ष गेले. त्यामुळे आम्ही राज्य करुन ते राबवण्यापेक्षा अजेंडा सेट करुन ज्यांनी स्विकारला तो सत्तेवर आला आणि राज्यकर्ता झाला. त्यामुळे येथील सर्व दलित चळवळी अयशस्वी झाल्या असं म्हणणार नाही”. 

“सत्तेत बसणं आणि अजेंडा ठरवणं या दोन वेगळ्या गोष्टी”

“सत्तेत बसणं आणि अजेंडा ठरवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अजेंडा जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा तुम्हाला हवं असणारं परिवर्तन मान्य करता. हे परिवर्तन तुम्ही राबवायचं की जे कोणी सत्तेवर आहेत त्यांनी राबवायचं यामुळे फरक पडत नाही. पण अजेंडा ठरवणं महत्त्वाचं आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 

“संतांचा अजेंडा आता केंद्रस्थानी”

पुढे ते म्हणाले की “संविधान आणि संत हे समान आहेत. संतांचा जो अजेंडा नेहमी बाजूला सारण्यात आला तो माझ्या अंदाजाने केंद्रस्थानी आला. स्त्रियांचं स्वातंत्र्य, बंधुभाव, सन्मान कऱणं हा विचार वेगवेगळ्या संतांच्या रुपाने आला. पण त्याचा सामना मनुस्मृतीशी झाला. पहिल्यांदाच सगळे मनुस्मृती बाजूला ठेवण्यास आणि संविधानातील सामाजिक रचना मान्य करण्यास तयार असल्याचं दिसत आहे. हे मान्य करुन घेणं, समाजात रुजवणं आणि समाजव्यवस्थेचा भाग होणं हा आम्ही सर्वात लढा मानतो. हे झाल्यास आमचं आंदोलन यशस्वी झालं असं मी मानतो”.

“माझ्याविरोधात विषारी प्रचार केला”

“गेल्या 50 वर्षात आरएसएस आणि काँग्रेसकडून एक समज निर्माण करण्यात आला. बाबासाहेबांनी बौद्ध विचारसरणी मान्य करण्यासंबंधीचा जो प्रचार करण्यात आला, त्याची धार आता कमी झालेली दिसत आहे. मी पहिल्यांदा 1984-85 च्या निवडणुकीत पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हा काँग्रेस आणि भाजपा एकत्र आले आणि नानात-हेच्या घोषणा दिल्या. शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर माझ्या मतदारसंघात आहे. मी निवडून आलो तर इथे मशीद होईल असा प्रचार करण्यात आला होता. हा विषारी प्रचार आहे. तुम्हाला प्रत्युत्तर देण्यास वेळ मिळत नाही आणि निवडणुकीवर त्याचा परिणाम होतो,” असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी राजकारणातील आपला प्रवास उलगडला. 

“काश्मीरचा प्रश्न सोडवला नाही सांगत डाव्या पक्षांनी बाबासाहेबांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. आरएसएला पाकिस्तानव्याप्त काश्मीर नको असतानाही ते बाबासाहेबांच्या विरोधातील प्रचारात उतरले होते. तेव्हापासून डावे आणि आरएसएस यांची मनं जुळली. ती परिस्थिती आम्ही आत्ता कुठे बदलत आहोत,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 

“आम्ही सत्तेत दिसू”

आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात असल्याचं लोकांना आता समजत आहे. यापुढे आम्ही सत्तेत दिसू. सत्तेसाठी आम्ही तत्वं सोडली नाहीत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 





Source link

Maharastra Politics: “नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही”

Maharastra Politics: “नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही”


Prakash Ambedkar sensational statement: आंबेडकरांनी थेट भाजपच्या दोन चेहऱ्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राजकारणात (Maharastra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.


Updated: Jan 30, 2023, 11:47 PM IST





Source link

झेपत नसेल तर राजीनामा द्या… सुप्रिया सुळे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र

झेपत नसेल तर राजीनामा द्या… सुप्रिया सुळे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र


Supriya Sule : कोल्हापुरातल्या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे


Updated: Jan 30, 2023, 02:12 PM IST





Source link

YouTube
Instagram
WhatsApp